Home > Politics > दैनिकांवरील छापेमारीवरुन खा.संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

दैनिकांवरील छापेमारीवरुन खा.संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका

दैनिकांवरील छापेमारीवरुन खा.संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका
X

शुक्रवारी दैनिक भास्कर व भारत समाचार या वृत्तपत्रांच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. या धाडीनंतर देशभरातील विविध माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार तथा दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. खा.संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "गेली वर्षानुवर्षे ते स्वाभिमानाची पत्रकारिता करत आहेत. अशाप्रकारे दहशतवादी असल्यासारखे त्यांच्या कार्यालयांवर रेड टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली अनेक वर्ष भास्कर आणि भारत समाचार या दोन्ही वृत्तपत्रांना पाहतोय. ते एक प्रामाणिक पत्रकारिता करत आहेत.


'गंगेतून वाहणारी प्रेतं' ही सर्वात मोठी बातमी त्यांनीच दिली होती. त्यामुळे पूर्ण देशाला सत्य माहित पडलं. देशातील बेरोजगारी बद्दल खरे आकडे त्यांनी सांगितले. सरकार कोरोनाबाबत आकडे लपवते याची माहिती त्यांनी वृत्तपत्राद्वारे दिली. म्हणूनच ही कारवाई झाल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. वृत्तपत्र हे लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असल्याने सरकाने वृत्तपत्राचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे. भास्कर आणि भारत समाचारवर कारवाई करून कोणाला वाटत असेल की आम्ही दहशत निर्माण करू शकतो तर ते भ्रमात आहेत. असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात आमच्या 'मार्मिक' ला देखील टाळे लागले होते, तेव्हा सर्वात मोठी क्रांती झाली. जर भारतवृत्त समूहाबाबत काही तक्रारी असतील तर नक्कीच चौकशी झाली पाहिजे. पण फक्त ते आपल्या विरोधात आहेत म्हणून अशा प्रकारचे छापे टाकणं हे चुकीचं आहे. ते सत्य बाहेर आणतात म्हणून अशा प्रकारच्या धाडी टाकणं हे देशाच्या परंपरेला शोभत नाही." असं म्हणत खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Updated : 24 July 2021 1:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top