Home > Politics > शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेवर डागली तोफ

शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेवर डागली तोफ

शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबेवर डागली तोफ
X

नाशिक (Nashik)पदवीधर मतदारसंघाचे धुळ्यातील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (shubhangi patil)यांनी आज धुळे शहरातील शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe)या विरोधी उमेदवारावरच चांगलाच निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित तांबे यांनी "वारसाने संधी मिळते परंतु कर्तुत्व मात्र सिद्ध करावा लागते" या ट्विटला प्रतिउत्तर देताना विरोधक उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांचा समाचार घेतला आहे, मी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आझाद मैदानावर (Azad Maidan)उतरले होते आणि माझं कर्तुत्व सर्वांनी बघितल आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 तारखेला वारसाला मिळतं की कर्तुत्वाला मिळतं हे 2 तारखेला जनता दाखवेलच असे म्हणत शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांना टोला लगावला आहे.

कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या सत्यजित तांबे यांना दिलेल्या पाठिंब्यावर बोलताना शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील हे शिक्षक आमदार आहेत, त्यांना हाडाची शिक्षिका दिसली नसावी असे म्हणत काम करणाऱ्यांना संधी न देता त्यांना आणखी दुसरा काही विचार त्यांनी केला असावा असे म्हणत शुभांगी पाटील यांनी कपिल पाटील यांच्या पाठिंब्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कपिल पाटील यांच्या पाठिंब्याचा फारसा परिणाम या निवडणुकीदरम्यान पडणार नसल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत (sanjay raut)लवकरच महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi)काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मनवतील सत्यजित तांबे यांनी केलेल्या भावनिक ट्विट वरून देखील शुभांगी पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्याकडून केलेले ट्विट म्हणजे मतदारांशी डीलच सुरू असल्याचा आरोप लावला आहे. "तुम्ही जर मला माझ्या पडत्या काळात साथ दिली, तर माझा पुढील काळ हा संपूर्ण साथ देणाऱ्यांसाठी असेल" असे म्हणत मतदारांशी डील सध्या सत्यजित तांबे यांच्याकडून केल जात असल्याचा आरोप देखील शुभांगी पाटील यांनी केला आहे. सध्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून सुरू असलेल्या पेचासंदर्भात मातोश्रीवरून उद्धव ठाकरे व संजय राऊत हे लवकरच महाविकास आघाडीच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मनवतील व मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असा विश्वास यावेळी शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राजकारणाचे डाव जनतेसोबत खेळल्यास जनता त्याचं उत्तर जरूर देते. सुधीर तांबे यांनी काल धुळ्यात येऊन ज्या टीडीएस संघटनांचा पाठिंबा आपल्याला मिळाला आहे असे स्पष्ट केले आहे. त्याच टीडीएस संघटना पुरोगामी विचाराच्या असून त्या भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे म्हणत टीडीएस संघटनेच्या सत्यजित तांबे यांच्या पाठिंबावर देखील शुभांगी पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेनेच्या शिक्षक संघटनेसह विविध संघटना या आपल्या सोबत असल्याचे म्हणत त्यांच्यासोबत असलेल्या संघटनांचा उल्लेख देखील यावेळी शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची उमेदवारी डावलली हे राजकारणाचे डावपेच असल्याचे काल धुळ्यात बोलल्यानंतर या वक्तव्यावर देखील शुभांगी पाटील यांनी निशाणा साधत, राजकारणाचे डाव जनतेसोबत खेळल्यास जनता त्याचं उत्तर जरूर देते असं म्हणतसुधीर तांबे यांच्या वक्तव्याचा देखील समाचार शुभांगी पाटील यांनी घेतला. दोन तारखेला विजयाचा गुलाल हा उद्धव ठाकरे शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी हा विजयाचा गुलाल महाविकास आघाडीचा असेल असे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 19 Jan 2023 1:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top