Home > Politics > जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ पाहिले का? संजय राऊतांचा टोला

जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ पाहिले का? संजय राऊतांचा टोला

जगात कुठे दोघांचे मंत्रिमंडळ पाहिले का?  संजय राऊतांचा टोला
X

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. खरे तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय अवैध असल्याचे सांगत नवीन सरकारने पुन्हा त्याच निर्णयावर शिक्कामोर्तब केले. यावर आता शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

अत्यंत बालिशपणे राज्याचा कारभार सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव ही नावं देणं लोकभावना आहे, त्याबाबत ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता तो निर्णय हे सरकार कसं काय रद्द करू शकतं, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. जगात कुठेही दोन मंत्र्य़ांचे मंत्रिमंडळ पाहिले आहे का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. शिंदे सरकारने पाकीटमारीमधून बहुमत मिळवलं आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

दोघांचे कॅबिनेट हा देशात चेष्टेचा विषय, यापूर्वी महाराष्ट्राची अशी चेष्टा झाली नव्हती, असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर विधिमंडळ अधिवेशन पुढे ढकलण्याबाबतही संजय राऊत यांनी टीका केली आहे. अधिवेशन घ्यायची हिंमत यांच्यात नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेना फुटल्याच्या काही जणांना गुदगुल्या होत आहेत. मात्र, शिवसेना अशी फुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

Updated : 16 July 2022 5:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top