Home > Politics > उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली? १२ खासदारही शिंदे गटात?

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली? १२ खासदारही शिंदे गटात?

उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली? १२ खासदारही शिंदे गटात?
X

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले आणि सरकार कोसळले. पण यानंतर आता उद्धव ठाकरे यांना पक्षावरील आपली पकड देखील गमवावी लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत खासदारांनी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करावा लागला.

पण आता राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिवसेनेच्या बैठकीला दिल्लीमधून शिवसेनेचे १२ पेक्षा जास्त खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आमदारांपाठोपाठ खासदारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसल्याचे उघड झाले आहे.

तिकडे याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले खासदार विनायक राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना एक गौप्यस्फोट केला आहे. संसदेच्या अधिवेशनातच शिवसेना खासदारांना फोडण्याचं कट आखला असल्याचा आरोप शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक खासदार दिल्लीकरांच्या दबावाखाली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे, तसेच अनेक खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. ED, CBI चा वापर करुन खासदारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणते खासदार राहतील आणि कोणते खासदार शिंदे गटात जातील याबाबत काही नावं चर्चेत आहेत. ही चर्चेतील नावं कोणती ते पाहूया...

शिवसेना गटात राहणारे खासदार…

1. गजानन कीर्तिकर

2. अरविंद सावंत

3. विनायक राऊत

4. राजन विचारे

5. हेमंत पाटील

6. कलाबेन डेलकर (दादरा-नगर हवेली)

7. संजय जाधव

08. ओमराजे निंबाळकर

शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार

1. हेमंत गोडसे

2. धैर्यशील माने

3. प्रताप जाधव

4. सदाशिव लोखंडे

5. राहुल शेवाळे

6. श्रीरंग बारणे


07. राजेंद्र गावीत

08. भावना गवळी

09.संजय मंडलिक

10.. श्रीकांत शिंदे

11. कृपाल तुमाने

Updated : 18 July 2022 6:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top