Home > Politics > राज्यपालांच्या पत्रानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यपालांच्या पत्रानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यपालांच्या पत्रानंतर संजय राऊत यांचा हल्लाबोल
X

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सरकार अस्थिर झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाबद्दल शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित होत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.अशा निर्णयांमुळे भारताच्या घटनेची पायमल्ली होत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाजूने ४० हुन अधिक आमदार असल्याने ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता बहुमत चाचणीची प्रक्रिया सूरु होऊन संध्याकाळी ५वाजेपर्यंत हि प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.आमदारांच्या अपात्रतेचा मुद्या सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.

"16 आमदार निलंबन प्रकरणी... दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ११जुलै पर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधान सभेचे आधिवेशन १ दिवसात बोलावतात हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे.",असं ट्विट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे . महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत होण्याची प्रतिक्षा भाजपकडून केली जात होती.त्यामुळेच 12 आमदारांची फाईल रखडवली असल्याचे त्यांनी म्हटले.भाजपकडून संविधानाच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचा आरोपसुद्धा संजय राऊत यांनी केला आहे .

Updated : 29 Jun 2022 11:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top