आम्हीच 'बाळासाहेबांची शिवसेना..' खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिकिया
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय....'' केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिकिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बाळासाहेबांचा फोटो शेअर करत आम्हीच 'बाळासाहेबांची शिवसेना'' अशी भावना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे...
X
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाला नवी नावं आणि पक्षचिन्ह सुचवण्यास सांगितले होते. आज सोमवारी दिवसभर आयोगासमोर झालेल्या सुनावणीत अखेर निर्णय झाला आहे. यानुसार ठाकरे गटाला 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' हे पक्षाचं नाव, तर मशाल हे पक्षचिन्ह मंजूर झालं आहे. तर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय आल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 'आम्हीच बाळासाहेबांचे वारसदार, आम्हीच 'बाळासाहेबांची शिवसेना' अशी प्रतिकिया दिली आहे..
आयोगाच्या या निर्णयानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, ''वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय....आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार… आम्हीच ' बाळासाहेबांची शिवसेना ' !''
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय....
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) October 10, 2022
आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार… आम्हीच ' बाळासाहेबांची शिवसेना ' !#बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/RfaVMq9Ud6
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…." अशी भावना निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर व्यक्त केली आहे..
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC