Home > Politics > शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
X

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून आज शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निकृष्ट दर्जाचं काम असल्याने आम्ही जाब विचारला त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केला आहे. तर युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांनी रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला आम्ही त्यांना महापालिकेत जाऊन विचारा असं सांगितलं त्याचाच राग येऊन त्यांनी वाद घातला. आम्हाला मारहाण केल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान या एकत्र सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आपापसातील वादामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे आज दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले असता नागरिकांनी निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप केल्याने नागरिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू होते. यात मध्यस्थी करताना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली काही क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत जाब विचारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी दादागिरी करत मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केला. सोबतच राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पाटील यांनी म्हटले.

तर या भागातील युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी आले होते, त्यांनी कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला विचारा असे सांगितले याचाच राग येऊन त्यांनी शिवसेना कार्यकर्त्याना मारहाण केली. करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा वाद चिघळल्याचे सांगितलं

Updated : 14 Oct 2021 5:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top