Home > Politics > आज मी शेर आहे; आत्ताचं राजकारण हे पावशेर:उद्धव ठाकरे

आज मी शेर आहे; आत्ताचं राजकारण हे पावशेर:उद्धव ठाकरे

आज मी शेर आहे; आत्ताचं राजकारण हे पावशेर:उद्धव ठाकरे
X

उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी ताज्या. जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काहि आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावतॆ पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होत. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही एउसवे फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले

ठाकरे पुढे म्हणाले, सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवे. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता. अस म्हटलं जात पायलट त्याचे ट्रेनिंग तसा एखादा कार्यकर्तागेला तर तो मोठा फटका असतो.

आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होये आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय, असंही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले. मला राज्य पाहिजे पण कारभार जमणार नसेल तर तुम्ही नालायक ठराल असा इशारा त्यांनी दिला.

केंद्राच्या अग्निपथ योजनेवर टीका करतान उध्दव ठाकरे म्हणाले, अग्निपथ मुळे तरुण रस्त्यावर. ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्नीवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नौकरीचा पत्ता नाही.

प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या भाषणात शिवाजी महाराज, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळच वापरा आणि फेका. मग ही लोक भडकणार नाही तर काय. तुम्हाला मत दिल ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याची निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही. प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे.

महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगल काम करतोय. आमशा १३०० मतांनी पडले. आदिवासी हक्काचा माणूस. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले. हे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणी साठी नविन रक्त. देसाई रावतेंनी सांगितले तुम्ही निर्णय घेतला ते मान्य आम्ही शिवसैनिक. म्हणूनच आपण ५६ वर्षे टिकलो. शिवसेना अजून नुसते ५६ नाही तर अजून खूप पुढे जाणार आहे, असं उध्दव ठाकरे शेवटी म्हणाले..

Updated : 19 Jun 2022 3:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top