Home > Politics > सरकार पडल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? शरद पवार संतापले...

सरकार पडल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? शरद पवार संतापले...

सरकार पडल्यास राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? शरद पवार संतापले...
X

शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातमधील सुरतमध्यला एका हॉटेलमध्ये शिवसेनेच्या इतर आमदारांसह थांबले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीमध्ये असल्याने त्यांची भूमिका काय याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

सकाळपासून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली, त्यानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मुळात एकनाथ शिंदे यांची नाराजी ही शिवसेनेची अंतर्गत बाब आहे, त्यावर आपण भाष्य करणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांचा काय निर्णय़ होतो, त्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

पण जे संकट आले आहे त्यावर मार्ग निघू शकतो, असे आपल्याला वाटते असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. पण यावेळी पत्रकारांनी सरकार कोसळले तर राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का, असे विचारताच शरद पवार संतापले, असे प्रश्न विचारायचे असतात का, असाही सवाल त्यांनी विचारला. पण शरद पवार यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे शरद पवार यांची भूमिका या सर्व राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरु शखकते.

Updated : 21 Jun 2022 5:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top