महाविकास आघाडीचा भाजपला धक्का: मुंबै जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे
X
मोठ्या वादानंतर अखेर संपुष्टात आलं आहे. महाविकास आघाडीच्या रणनीतीमुळे मुंबै जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे भाजपचे प्रसाद लाड यांना हरवून विजयी झाले आहेत.
११ विरूद्ध ९ मतांनी कांबळे विजयी झाले. तर उपाध्यक्ष पदासाठी समान मतं मिळाली होती. यानंतर ईश्वर चिठ्ठीने याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उपाध्यक्ष पद विठ्ठल भोसले यांच्याकडे गेलं आहे. थोडक्यात अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि उपाध्यक्षपद भाजपकडे गेलं आहे. एक वर्षांनंतर मुंबै बँक अध्यक्षपद शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती आहे.
अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षांनी मुंबै बँकेवरील भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत सत्ता परीवर्तन करण्याची रणनीती आखले. मुंबै बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं सरशी साधली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे आता मुंबै बँकेवरील भाजपाचं वर्चस्व कमी झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थात पर्यायाने महाविकास आघाडीच्या वर्चस्वाखाली ही बँक आली आहे.
नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत पराभूत झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीनं या निवडणुकीत मात्र बाजी मारून कसर भरून काढल्याचं बोललं जात आहे.
उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपच्या गळ्यात पडलं आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचं ठरलं. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.
ॲक्सिस बँकेचे सर्वेसर्वा म्हणून अनेक वर्ष काम करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या संचालक पदावरून कोर्टबाजी सुरू असून चौकशांचे सत्र सुरू आहे.त्यामुळे अध्यक्षपदापासून वंचित राहिल्या बरोबरच त्यांच्या संचालक पदावर ही संकट कायम आहे.