तिकडे गेला आणि पवित्र झाला, ED च्या वापरावरून राही भिडे यांचा टोला
भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातचा निरमा असल्याचं वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून केलं जात आहे.
XSenior Journalist Rahi Bhide comment on BJP, ED and Eknath Shinde
विरोधी पक्षातील नेता भाजपमध्ये गेला तर तो पवित्र होतो, अशी टीका विरोधी पक्षाकडून वारंवार केली जाते. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार गेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.
मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ज्या आमदार आणि खासदारांवर ईडीची कारवाई सुरु होती. ती कारवाई अचानक स्थगित झाली. त्यामुळे जो भाजपमध्ये जातो तो पवित्र होतो, अशी म्हण सध्या वापरली जाते. त्याच प्रकारे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी या स्थितीवर भाष्य केले आहे.
राही भिडे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार भाजपसोबत गेले. त्यातच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, असे अनेक जण आहेत. त्यामुळे जो तिकडे गेला आणि पवित्र झाला, अशी स्थिती निर्माण होत असल्याची टिपण्णी राही भिडे यांनी केली.
हे ही वाचा.... Exclusive : उध्दव ठाकरे थेट शरद पवार यांना म्हणाले होते 'भिऊ नका मी पाठीशी आहे'
हे सुध्दा पहा...