एकनाथ शिंदे गटाला दिलासा, शिवसेनेला धक्का
X
गटासाठी दिलासादायक बातमी आली आहे. शिंदे यांच्यासह बंड करणाऱ्या गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली होती. त्याला शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यानंतर या कारवाईला ११ जुलैपर्यंत स्थगिती मिळाली. पण दरम्यानच्या काळात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आणि ठाकरे यांनी राजीनामा दिला.
यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच २ आणि ३ जुलैला विधानसभेचे अधिवेशन बोलावून बहुतम सिद्ध करण्याची तयारी केली आहे. या तयारीला शह देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तसेच ज्या आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा जारी करण्यात आल्या होत्या, त्या अपात्र आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखावे, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालय अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय घेईपर्यंत त्यांना प्रतिबंधित केले जावे, अशीही मागणी याचिकेत केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे शिंदे गटाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे ३९ आमदार आहेत, त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा त्यांचा दावा आहे. त्यांना भाजपची आणि अपक्षांची साथ असल्याने सध्या शिंदे सरकारचे संख्याबळ १५०च्या वर गेले आहे. पण गटनेता कोण उद्धव ठाकरे यांनी नेमलेले अजय चौधरी की एकनाथ शिंदे याचा निर्णय प्रलंबित असताना नवीन विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एकनाथ शिंदे गटाला दिलासा, शिवसेनेला धक्का