Home > Politics > धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, संजय राऊत यांचा शिवसेनेला इशारा

धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, संजय राऊत यांचा शिवसेनेला इशारा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेतल्यानंतर संजय राऊत यांनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे.

धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, संजय राऊत यांचा शिवसेनेला इशारा
X

शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ताब्यात देत निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला धक्का दिला. त्यावरून राजकारण तापलं आहे. त्यातच आमचा धनुष्यबाण चोरणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा संजय राऊत (Sanjay raut) यांनी माध्यमांशी बोलताना दिला. (Sanjay Raut Warn to Eknath Shinde group)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, अलीकडे मंदिरातही चोरी व्हायला लागली आहे. चोर मंदिराचे कळसंही चोरून नेत आहेत. त्याप्रमाणेच शिवसेनेच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाण चोरांनी चोरून नेला आहे. पण हे चोर नेमके कोण आहेत आणि या चोरीसाठी कोणत्या महाशक्तीने मदत केली आहे. हे आम्ही जनतेला सांगणार आहोत. त्यामुळे या चोरांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, आमच्याकडील कोणतेही आमदार खासदार आम्हाला सोडून जाणार नाहीत. कारण काल आपण परिस्थिती पाहिली आहे. ज्यावेळी लोकांची एवढी गर्दी जमली होती. त्यावेळी उध्दव ठाकरे यांना गाडीच्या टपावर बसून भाषण करावे लागले. त्यामुळे या भाषणावेळी लोकांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही गाडीच्या टपावर उभा राहून भाषण केल्याचं आठवलं. त्यावरून जनता कुणाच्या बाजूने आहे ते समजले आहे. तर जे सोडून गेले आहेत. त्यांना ज्याप्रमाणे लोक चोरांना रस्त्यावर पकडून मारतात. त्याप्रमाणे रस्त्यावर धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

धनुष्यबाणाच्या चोरीनंतर लोकांच्या मनात रोष आहे. तो रोष लोक व्यक्त करतील. मात्र भाजपकडून ज्याप्रमाणे शिवसेना मोदींचा (PM Modi) मुखवटा वापरून मत मागितल्याचा आरोप करत होत होता. तो आरोप आता फोल ठरला आहे. भाजपला बाळासाहेब ठाकरे यांचा मुखवटा वापरून नाचावं लागत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

Updated : 19 Feb 2023 8:29 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top