Home > Politics > "तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही"; संजय राऊतांनी भाजपाला ठणकावले

"तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही"; संजय राऊतांनी भाजपाला ठणकावले

तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही; संजय राऊतांनी भाजपाला ठणकावले
X

मालाडमधील क्रिडासंकुलाला टिपु सुलतानचं नाव देण्यावरुन वाद पेटला होता.टिपु सुलतानच्या नावाला भाजपाने विरोध केला.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बजरंग दलच्या कार्यकर्त्यानी क्रिडासंकुलासमोर आंदोलन केले,यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची झटपट झाली.या प्रकरणावरुनच सत्ताधारी आणि विरोंधकांमध्ये शाब्दीक वाद रंगला असून आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

भाजप नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केला असता संजय राऊत म्हणाले "सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे.कर्नाटकच्या विधानसभेत जाऊन त्यांनी टिपु सुलतानचं गुणगाण गात गौरव केला होता.ऐतिहासिक योद्धा स्वातंत्रयसैनिक या उपाध्या राष्ट्रप्रतीनींच दिल्या आहेत. राजीनामा घ्यायचा असेल तर आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा".

'टिपु सुलतानचं काय करायचं ते आम्ही बघु,आम्हाला इतिहास कळतो,तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही. तुम्ही इतिहास कशाप्रकारे बदलताय,दिल्ली मध्ये कशाप्रकारे इतिहास नव्याने लिहायला घेतला आहे, हे आम्हाला माहीती आहे.म्हैसुर राज्य आणि टिपु सुलतान हे आम्हाला ठाऊक आहे.त्याने कशाप्रकारे अन्याय केले हे ही आम्हाला माहीती आहे'.

"आंदोलन करु,महाराष्ट्र पेटवु अशी भाषा जर भाजपाची असेल तर,महाराष्ट्रमध्ये पेटवापेटवी मध्ये कोण एक्सपर्ट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे,पण आम्ही ते करत नाही". असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे. "मुंबईत काय करायचं त्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकार समर्थ आहे. काळजी कऱण्याचं कारण नाही. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही" असही ते म्हणाले.

Updated : 27 Jan 2022 3:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top