Goa Election : आमच्याकडे भाजपच्या सर्व उमेदवारांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट – संजय राऊत
X
गोवा विधानसभा निवडणूकीचा सामना रंगायला सुरूवात झाली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
गोवा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी राऊत म्हणाले की, मनोहर पर्रिकर हे गोवा भाजपचे संस्थापक होते. तर त्यांनी भाजप पक्ष रुजवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मात्र आज त्यांच्याच मुलाला उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या दारात भीक मागायची वेळ आली आहे. तर अशा प्रकारे कन्व्हिन्स करण्याला वैतागून त्याने भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांची वेदना मी समजून घेतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला. तो पक्ष सोडताना काय वेदना होत असतील, त्या मी त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवल्या. माझ्या उत्पल पर्रिकरांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी फटकेबाजी करताना म्हटले की, भाजपने जाहीर केलेल्या 34 उमेदवारांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट शिवसेनेकडे आहे. मात्र लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गोव्यात भाजपची बीजे रोवली. हे सगळे चारित्र्यवान कार्यकर्ते होते. तर ते आज म्हणत आहेत की आम्ही भाजपला पैसे देऊ शकलो नाही म्हणून आमची उमेदवारी नाकारली. तर हे दुर्दैवी आहे, असे राऊत म्हणाले.
गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याबाबत मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी बोललो होतो. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींना हे समजत नाही. ते आणचं ऐकत नाहीत. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून असा सवाल संजय राऊत यांनी गोवा काँग्रेसच्या नेत्यांना विचारला.
याबरोबरच राऊत म्हणाले की, मी आशिष शेलार यांनी नेहमी चहा पाजतो. त्यामुळे डिपॉझिट गेलं म्हणून निवडणूक लढायचं नाही, असे आयोगाने कुठे सांगितले आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले. तर आम्ही तुमच्या सारखे भ्रष्ट माफिया धनदांडगे यांना उमेदवारी दिली तर आम्ही जिंकून आलो असतो. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.