भाजपा बेडर आणि निर्लज्ज- संजय राऊत
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, असा आरोप राऊत यांनी केला. कसबा मतदारसंघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटल्याच्या आरोपावर राऊतांनी सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे, असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी भाजपावर केला.
X
सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत भय आहे, असा आरोप संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. तसेच भाजपा (BJP) बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं. त्यांनी हीच निर्भयता निवडणुकांना सामोरे जाण्यात दाखवावी, असं आव्हान दिलं. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. तसेच राऊत यांनी कसबा मतदारसंघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटल्याच्या आरोपावर सुद्धा राऊत यांनी टिका केला. सत्ताधाऱ्यांच्या मनात निवडणुकीला सामोरं जाण्याबाबत भय आहे. हे काही लोकशाहीचं लक्षण नाही. निवडणुकीला बेडरपणे सामोरं गेलं पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले. भाजपा बेडर आणि निर्लज्जपणे सरकार पाडतं, पैशांचं वाटप करुन आमदारांना विकत घेतं, हीच निर्भयता भाजपा निवडणूक घ्यायला का दाखवत नाही? असा सवाल संजय राऊतांनी भाजपाला विचारला. तसेच आमची इच्छा आहे की, निवडणुका ताबोडतोब घ्याव्यात, असंही राऊत यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील मागील मोठा काळा पोलीसांच्या मदतीने निवडणुकीत पैसे वाटप करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत बारामती-पुणे (Baramati-Pune) भागात पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटप होत होते हे पुराव्यासह उघड झालं, पोलिसच राजकीय एजंट बनून पैसे वाटतात हे अनेकदा पुराव्यांसह उघड झालं आहे, असे कसब्यात पैसे वाटण्याच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणाले. कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पैसं वाटण्याचे काम पोलिसांच्या गाड्यांमधून सुरक्षितपणे होऊ शकतं. असा आरोप केला आहे. हा अरोप धंगेकर यांच्याकडे पुरावा असल्याशिवाय करणार नाही, असे राऊत यावेळी म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, कारण याआधी भाजपाच्या कालखंडात पोलिसांच्या गाडीतून पैशांची आवक-जावक, वाटप झाल्याची उदाहरणं समोर आली आहेत. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.