Home > Politics > Sanjay Raut : चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले आहे. मात्र चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
X

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. त्यावरून राज्यात राजकारण तापले असतानाच संजय राऊत यांनी ट्वीट (Sanjay Raut Tweet) करून निवडणूक आयोग आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut Tweet : संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत, अशी माझी खात्रीची माहिती आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याबरोबरच देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut Allegation against Election Commission of india and Eknath Shinde Group)

Updated : 19 Feb 2023 9:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top