Home > Politics > बैलगाडा शर्यत: कायदा मोडला, गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत: कायदा मोडला, गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत: कायदा मोडला, गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल
X

भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत घेऊन दाखवली. सांगली जिल्ह्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असतानाही सांगली येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली. त्यामुळे पडळकर यांच्यासह इतर 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानासुद्धा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे 20 ऑगस्टला बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यानुसार कायद्याचं उल्लघन केलं म्हणून बेकायदा जमाव जमविणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे.

सुरवातीला नाका-बंदी त्यानंतर झरे गावच्या आसपास परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर या परिसराततील रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आली. स्पर्धेचे ठिकाण आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, तरीही बैलगाडी शर्यती या गनिमीकाव्याने झरे गावात ही शर्यत आयोजीत करण्यात आली होती.

माजी मंत्री सदाभाऊ खोत येथील बैलगाडा शर्यतीच्या मैदानात आले होते. पोलीस बळाचा वापर करून स्पर्धा चिरडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा मावळ करण्याचा सरकारचा उद्देश दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वाघाची डरकाळी कुठे गेली, बैलगाडी शर्यत सुरू करतो. मुख्यमंत्री आत्ता झरे येथील बैलगाडी शर्यतीला विरोध का करीत आहेत. असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी ही बैलगाडा शर्यत यशस्वी करण्यास हातभार लावला.

Updated : 21 Aug 2021 7:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top