"पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे; समीर वानखेडे मोदींच्याही पुढे"
X
राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( nawab malik ) यांनी आज पुन्हा एनसीबी अधिकारी ( Ncb Officer) समीर वानखेडे ( sameer wankhede ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे वाद आणखीच पेटताना दिसत आहे. मलिक यांनी पत्रकार परिषेदत आरोप करतांना, "समीर वानखेडे लाखाची पँट, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे घालतात" असा आरोप केला आहे.
यावेळी बोलताना मलिक म्हणाले की, समीर वानखेडे घालत असलेल्या कपड्यांचीच किंमत पाच-दहा कोटी आहे. वानखेडे घालत असलेल्या शर्ट 70 हजार रुपयांचा आहे. एवढच नाही तर, समीर वानखेडे यांची पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे आणि घडी 50 लाखांची असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.त्यामुळे वानखेडे हे मोदींच्याही पुढे गेले असल्याचा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
तर समीर वानखेडे यांनी हजारो कोटींची वसुली केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे, अशीही मागणीही सुद्धा यावेळी मलिकांनी केली. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळत आहे. तर याच मुद्यावरून आता राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे.