Home > Politics > विचारवंतांच्या हत्या ते समीर वानखेडे, नवाब मलिकांचे सभागृहात गंभीर आरोप

विचारवंतांच्या हत्या ते समीर वानखेडे, नवाब मलिकांचे सभागृहात गंभीर आरोप

विचारवंतांच्या हत्या ते समीर वानखेडे, नवाब मलिकांचे सभागृहात गंभीर आरोप
X

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकमधून आलेल्या धमकीचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनात तीव्र पडसाद उमटले. या चर्चे दरम्यान विचारवंतांच्या हत्यांचे धागेदोरे कर्नाटकमध्ये असल्याचा मुद्दा शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी मांडला. त्यानंतर नवाब मलिक यांनी याप्रकऱणी गंभीर आरोप केले. सुशांत सिंह प्रकऱणात राज्याच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट आखण्यात आला होता, तसेच सुशांत सिंह ट्विटवर ट्रेंडिंगमध्ये राहण्यासाठी तीस लाख रुपये खर्च केले जात आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. याशिवाय भाजपच्या एका नेत्याच्या गाडीमधून बिहारच्या पोलिसांनी मुंबईत सुशांत सिंह प्रकरणाचा तपास केला असाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे विचारवंतांच्या हत्यांचे कर्नाटक कनेक्शन, सुशांत सिंह प्रकरणात समीर वानखेडे यांचा संबंध या सगळ्या गोष्टींचा तपास झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.


Updated : 23 Dec 2021 5:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top