Home > Politics > साजापूर जि.प. शाळा शिक्षकांअभावी...

साजापूर जि.प. शाळा शिक्षकांअभावी...

संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालाली आहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराचा नाहक फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. पहिली ते आठवीच्या ११०० विद्यार्थ्यांसाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

साजापूर जि.प. शाळा शिक्षकांअभावी...
X

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad ) शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे वाळूज परिसरातील साजापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना (students) ज्ञानार्जन करण्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत जवळपास ११०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र या शाळेत गेल्या ३ वर्षापासून शिक्षकांच्या (teachers) ७ जागासह मुख्याध्यापकाची १ अशा एकूण ८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकाअभावी (teachers) एकाच वर्गात दोन वर्गाचे विद्यार्थी (students) बसून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

मात्र ज्ञानार्जनापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जि. प. उर्दू विद्यार्थ्यांसाठी गावातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी सेवाभावनेने मोफत शिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. निद्रिस्त असलेल्या शिक्षण विभागाने येथील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लक्ष देऊन रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक वर्गातून केली जात आहे.

Updated : 9 March 2023 9:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top