Home > Politics > रुपयाची घसरण थांबवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा अजब उपाय

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा अजब उपाय

गेल्या अनेक दिवसांपासून रुपयाची घसरण सुरुच आहे. त्यापार्श्वभुमीवर अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक अजब उपाय सांगितला आहे. पण हा उपाय नेमका काय आहे? पाहुयात...

रुपयाची घसरण थांबवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांचा अजब उपाय
X

गेल्या अनेक दिवसांपासून रुपयाची (Rupee falls against dollar) मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. रुपया 83 रुपयांच्या वेशीवर पोहचला आहे. त्यापार्श्वभुमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रुपयावर एका बाजूला महात्मा गांधी ( Mahatma Gandhi) तर दुसऱ्या बाजूला गणपती (ganpati) आणि लक्ष्मीचे (Lakshmi) फोटो मुद्रीत करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, एकीकडे देशाचे चलन कमकुवत होत आहे. अर्थव्यवस्थाही दोलायमान स्थितीत आहे. त्यामुळे सध्याच्या संकटकाळात ईश्वराचा आशिर्वाद असणे आवश्यक असते. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करतो की, त्यांनी रुपयावर एका बाजूला असलेला महात्मा गांधी यांचा फोटो तसाच ठेवावा. मात्र दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो मुद्रीत करावा. त्यामुळे रुपया मजबूत होण्यास मदत होईल, असा अजब दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

इंडोनेशियाचे दिले उदाहरण

अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सगळ्याच नोटा बदला असं माझं मत नाही. मात्र इंडोनेशियाने ज्याप्रमाणे त्यांच्या चलनावर गणपतीची फोटो मुद्रीत केला आहे. त्याप्रमाणे आपल्याकडेही रुपयावर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो मुद्रीत करायला हवा, असं मत अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

Updated : 26 Oct 2022 1:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top