संजय राऊत #ED कारवाईवर राजकीय नेते काय म्हणाले?
X
EDच्या १० अधिकाऱ्यांचे पथक रविवारी सकाळी सात वाजता संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत सीआरपीएफच्या जवानांचा तगडा बंदोबस्त होता. ईडीचे काही अधिकारी संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्रेही तपासत आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात काही आर्थिक व्यवहार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून झाले होते. त्यामुळे ईडीने वर्षा राऊत यांनाही काही प्रश्न विचारल्याची माहिती आहे. परंतु, ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी पुढील चौकसीसाठी संजय राऊत यांना बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेऊ शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना अटक होण्याची दाट शक्यता असताना विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया आल्या आहेत.. पाहूयात काय ते म्हणाताहेत ते....