रंजन गोगई यांची पेगासस वर पहिली प्रतिक्रिया
रंजन गोगई यांची पेगासस वर पहिली प्रतिक्रिया Ranjan Gogoi on Pegasus Response Amid Row Over Pegasus Scandal
X
माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर 2019 साली ज्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिची सुद्धा इजरायली स्पायवेयर Pegasus च्या माध्यमातून संभाव्य हेरगिरी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. Ranjan Gogoi on Pegasus Response Amid Row Over Pegasus Scandal
'मी यावर भाष्य करणार नाही.'
अशी प्रतिक्रिया माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली आहे. रंजन गोगोई हे सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. दरम्यान भारतात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, 2 केंद्रीय मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माजी निवडणूक आयुक्त या सगळ्यांवर पाळत ठेवली गेल्याचा दावा द वायरने आपल्या वृत्तात केला आहे. याचे तीव्र पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत.
Pegasus हेरगिरी प्रकरणावरुन संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने दुसऱ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही. या प्रकरणी संसदेत चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोपही केला जात आहे. यासर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोप फेटाळले आहेत आणि हा सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आऱोप केला आहे.