"शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या गाड्या फोडायला मराठा समाज मागे पाहणार नाही"
X
मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठीक-ठिकाणी होत असलेल्या आंदोलनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm uddhav thackeray) यांच्या गाड्या फोडायला सुद्धा मराठा समाज मागे पाहणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक रमेश केरे यांनी दिला आहे.
केरे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटले आहे की,"मराठा समाजाने आमदाराची गाडी फोडली, भाजप चे आमदार राजेश पवार आंदोलन स्थळी आले नाहीत या गोष्टीचा राग मराठा समाजाला येणे साहजिक आहे. यापुढे शरद पवार असतील, किंवा उद्धव ठाकरे "असतील, नाना पटोले, अशोक चव्हाण चव्हाण असतील यांच्याही गाड्या फोडायला समाज मागे पुढे पाहणार नाही,असा इशारा केरे यांनी दिला.
तर, राजकीय नेत्यांनो ती वेळ येऊ देऊ नका की लोक तुमच्या वर सुद्धा हल्ला करतील. कारण आम्ही आता ठरवलं आहे की स्वतः आत्महत्या करायची नाही, तर समोरच्यांची वाट लावायची,असंही केरे यावेळी म्हणाले.