Rajya Sabha Election Update LIVE : आतापर्यंत काय काय झाले?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 10 Jun 2022 1:41 PM IST
X
X
दुपारी १ वाजेपर्यंत 260 आमदारांनी मतदान केले आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आले नाही.
हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास दिला नकार
भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी घेतला महाविकास आघाडीच्या मतदानावर आक्षेप, आमदार सुहास कांदे, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी मतपत्रिका प्रतोद यांना न दाखवता हातात दिल्याचा आरोप
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी अँब्युलन्समधून येऊन केले मतदान
MIM ने भाजपविरोधात महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.
महाविकास आघाडीच्या ३ नेत्यांच्या मतदानाला भाजपचा आक्षेप
पराभव दिसत असल्याने भाजपचे आरोप- यशोमती ठाकूर
भाजपचे धनंजय महाडिक हे देखील राज्यसभा निवडणुकीत विजयी ठरतील, असा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दुपारी 2.00 वाजेपर्यंत 281 आमदारांनी मतदान केले आहे.
Updated : 10 Jun 2022 3:07 PM IST
Tags: bjp congress shivsena rajya sabha election 2022 rajya sabha election maharashtra politics politics
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire