Home > Politics > अखेर गेहलोत सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, अशोक गेहलोत, सचिन पायलट वाद मिटणार का?

अखेर गेहलोत सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, अशोक गेहलोत, सचिन पायलट वाद मिटणार का?

अखेर गेहलोत सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, अशोक गेहलोत, सचिन पायलट वाद मिटणार का?
X

राजस्थानमध्ये अखेर अशोक गेहलोत यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 15 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 5 मंत्री सचिन पायलटचे गटाचे आहेत.

आज 11 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. गेहलोत यांनी 2018 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वाद झाला होता. सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले होते. या बंडानंतर 16 महिन्यांनी गेहलोत मंत्रिमंडळाचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. या मंत्रीमंडळात पायलट गटातील नेत्यांना स्थान दिल्याने राजस्थान कॉंग्रेसमधील वाद मिटणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

गेहलोत यांच्या नव्या मंत्रिमंडळात आता 30 मंत्री आहेत. त्यात 12 नवीन चेहरे आहेत. या फेरबदलात तीन राज्यमंत्र्यांना बढती देऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या मंत्र्यांना घेतली शपथ...

हेमाराम चौधरी, टिकाराम ज्युली, गोविंदराम मेघवाल, विश्वेंद्र सिंह, रमेश मीना, रामलाल जाट, भजनलाल जाटव, महेंद्रसिंग मालवीय, महेश जोशी, ममता भूपेश बैरवा आणि शकुंतला रावत या आमदारांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्यमंत्री- राजेंद्र गुढा, जाहिदा, मुरारिला मीना आणि ब्रिजेंद्र सिंग या आमदारांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नवीन मंत्रिमंडळात, पायलटचे निष्ठावंत रमेश मीणा आणि विश्वेंद्र सिंह यांची कॅबिनेट मध्ये वापसी झाली आहे. तर ब्रिजेंद्र सिंह ओला, हेमाराम चौधरी आणि मुरारीलाल मीणा या नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुरारीलाल मीणा यांना राज्यमंत्री पद दिलं आहे. तर इतर तीन निष्ठावतांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागली आहे.

या मंत्रीमंडळ विस्तारात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजालाही संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Updated : 21 Nov 2021 7:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top