उध्दव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिंदेनाही राज ठाकरेंचा सल्ला
साधा एक आमदार असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या माजी मुख्यमंत्री आणि नवे मुख्यमंत्र्यांना सल्ले देण्यात व्यग्र आहेत.
X
काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांना समाज माध्यमांमधून सल्ला दिला होता.
एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो," असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी हे विधान करताना कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. पण उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर केलेल्या पार्श्वभूमीवर हा त्यांनाच टोला तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सल्ला दिला आहे.
एकंदरीत फक्त एकाच आमदाराचं बळ असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय प्रगती सर्व महाराष्ट्राला ठाऊक असताना त्यांचे सल्ले मात्र आजी-माजी मुख्यमंत्र्यांना जात असल्याने समाज माध्यमावर वेगळी चर्चा सुरू झाली आहे.