Home > Politics > "अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय - राज ठाकरे

"अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय - राज ठाकरे

अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटतंय - राज ठाकरे
X

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तर, राज्य सरकार बाजू मांडण्यामध्ये कमी पडलं असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकारपरिषदेत बोलताना एक मोठं विधान केलं आहे. "अनेकांना जातीपातीच्या राजकारणातचं महाराष्ट्र खितपत पडावा असं वाटत आहे आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं राजकारण आहे" असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, "एकदम अचानक हा ओबीसीचा विषय आला कसा? मग ते केंद्र सरकारने यांना मोजणी करायला कशी काय सांगितली. मग कोर्टामध्ये याविरोधात कसा काय निर्णय आला? हे काही दिसतं तेवढं सरळ प्रकरण नाही. तुम्हाला आठवत असेल तर मी अनेकदा या विषयावर बोललो आहे की, आपण जोपर्यंत जातीपातीमधून बाहेर येणार नाही. तोपर्यंत आपल्याला चांगली गोष्टी, चांगला महाराष्ट्र मिळणार नाही. या सर्वात मुख्य विषय बाजूला पडतात आणि कुठल्याही गोष्टीची उत्तर तुम्हाला सापडतच नाहीत. आजही मला सापडलेलं नाही की मुकेश अंबानीच्या घराखाली गाडी ठेवली ती कशासाठी? काही कळलं का तुम्हाला त्यामधून? कोणालाच काही कळालं नाही. मी माझ्या पत्रकारपरिषदेत बोललो होतो, की हा विषय राहीला बाजूला आणि प्रकरण भलतीकडे जाईल. मग ती गाडी ठेवली कशासाठी? काय हेतू होता? कोणी करवलं ते? ते राहीलं बाजूला" असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Updated : 13 Dec 2021 7:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top