राज ठाकरे धावले शिंदे गटाच्या मदतीला
X
राज ठाकरे आणि शिंदे गटाचे पुन्हा सूर जुळायला सुरु झाले आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना फोन करून सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) नेत्यांसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना फोन करून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात सल्ला दिला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये कॉपी मुक्त अभियान राबवायचे असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. या कॉपीमुक्त अभियानाचे प्रेझेंटेशन मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडले व त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच पेपर लिकेजचं प्रमाण रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा तास पेपर देण्यात येईल, असं मत केसरकर यांनी मांडले.
यावेळी केसरकर म्हणाले, दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात राज ठाकरे यांनी काल फोन केला होता. यावेळी राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या. यामध्ये राज ठाकरे म्हणाले, सुरुवातीची जी 10 मिनिटं फुकट जाणार आहेत. ती आम्ही नंतर त्यांना देऊ, असं दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांना सांगितले. तसेच मनसेचे शिष्टमंडळही भेटून गेल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.