Home > Politics > पंजाब सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का जमत नाही?

पंजाब सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का जमत नाही?

पंजाबच्या चरणजित सिंह चन्नी सरकारचं मोठं पाऊल, पेट्रोल डिझेलच्या दरात केली 10 रुपयांची कपात, उद्धव ठाकरे सरकार कधी घेणार निर्णय

पंजाब सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का जमत नाही?
X

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर आता राज्यांमध्ये व्हॅट कमी करण्यात येत आहे. पंजाब सरकारनेही तेलाच्या किंमती कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार, आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू केले जातील

यावेळी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी माध्यमांशी बातचीत केली... ते म्हणाले पंजाबमध्ये 20 वर्षांत पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली आहे. पंजाबमध्ये आज (रविवार) मध्यरात्रीपासून पेट्रोल 10 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. वाहनांच्या इंधनाचे दर कमी करण्यासाठी पंजाब सरकारने डिझेलवरील व्हॅट 9.92% आणि पेट्रोलवरील 13.77% ने कमी केला आहे.

केंद्र सरकारने पोटनिवडणूकांमध्ये भाजपला जोरदार फटका बसल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करामध्ये घट केली होती. त्यानंतर देशात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेलमागे प्रति लिटर 10 रुपयांनी घट झाली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना देखील व्हॅटमध्ये कपात करण्याची विनंती केली होती.

त्यानंतर भाजपशासीत अनेक राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करत जनतेला दिलासा दिला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या राज्यांचा समावेश आहे.

दरम्यान भाजप शासित राज्यात व्हॅट कमी केल्यानंतर कॉंग्रेसशासित पंजाबमध्ये देखील इंधनाच्या दरात घट केल्यानं पंजाबमधील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही पेट्रोल डिझेलच्या दरात घट करण्यात आलेली नाही. त्यामुळं कॉंग्रेसशासीत पंजाबमध्ये तेलाचे दर कमी केले जाऊ शकतात. तर महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या पाठींब्यावर चालणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पेट्रोल डिझेलचे करात का कपात करत नाही. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Updated : 7 Nov 2021 4:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top