Home > Politics > पंजाब विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली, 'हे' आहे कारण?

पंजाब विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली, 'हे' आहे कारण?

पंजाब विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली, हे आहे कारण?
X

16 फेब्रुवारीला रविदास जयंती असल्यामुळे अनेक पंजाबी लोक वाराणसीला जात असतात. त्यामुळे पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांनी केली होती. त्यामुळे आता उत्तरप्रदेश मध्ये 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. भाजप, काँग्रेससह सर्व पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

पंजाबमधील अनेक लोक गुरु रविदास जयंती निमित्त 16 फेब्रुवारीला वाराणसीत जाणार आहेत. त्यामुळे अनेक मतदार मतदानाला उपस्थित राहिले नसते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात आगामी काळात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यात निवडणूका होत आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रचारावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले आहेत. पाचही राज्यांच्या निवडणुकात ७ टप्प्यांमध्ये होणार आहेत. पंजाब विधानसभेचा 27 मार्च 2022 रोजी कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी एक टप्प्यात 117 जागांवर मतदान होणार आहे. तर 117 जागांपैकी 34 जागा आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. पंजाब विधानसभा निवडणूकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे.

पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 59 जागांवर विजय आवश्यक आहे. तर त्यासाठी सर्वच पक्ष ताकद लावत आहेत. गेल्या वेळी 2 नंबरवर असलेला आम आदमी पक्ष यंदा 1 नंबरचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर अकाली दलने बसपासोबत युती केली आहे. याबरोबरच भाजपने कॅप्टन अमरींदर सिंह आणि सुखदेव ढीढसा यांच्या पार्टीसोबत एकत्र येत सत्तेत येण्याचा दावा केला आहे.


राजकीय पक्षांच्या प्रचारावर निर्बंध

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रचारावर मोठे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे या निवडणुका ऐतिहासिक ठरणार आहेत. त्याचबरोबर पदयात्रा, सायकल आणि बाईक रॅली, मिरवणुकांवरही बंदी घालण्यात आली आहे.

Updated : 17 Jan 2022 5:19 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top