राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार का? शरद पवार यांनी केलं स्पष्ट
X
राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत चर्चेत आले आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. तर त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांनी भुमिका जाहीर केली आहे.
राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. तर यामध्ये विरोधी पक्षांकडून शरद पवार यांच्या नावावर एकमत होत असल्याची चर्चा आहे. त्यातच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटलं असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार नसू असं स्पष्ट केले आहे. तसंच मी राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विरोधी पक्षांकडून मी उमेदवार नसणार असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी चर्चेत आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जर शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील तर त्यांना राज्य काँग्रेसचा पुर्ण पाठींबा असल्याचे म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीने नाना पटोले यांचे आभार मानले होते. तसंच आपचे संजय सिंह यांनीही शरद पवार यांना फोन करून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीबाबत फोन केला होता.
शरद पवार यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर विरोधी पक्षाकडून गुलाम नबी आझाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर ममता बॅनर्जी यांनी देशभरातील 22 नेत्यांना राष्ट्रपती निवडणूकीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे गेल्यावेळीप्रमाणे यावेळीही विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीची निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.