पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ट्रोल
भाजपकडून राष्ट्रपती पदाची उमेदवारी दाखल करताना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कृत्यामुळे मोदी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले आहेत.
X
देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. तर भाजपकडून आदिवासी समाजातील द्रौपती मोर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिली आहे. तर द्रौपदी मोर्मु यांचा राष्ट्रपदी पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह राजनाथ सिंह उपस्थित होते. यावेळी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करताना तो उमेदवाराने देणे अपेक्षित असताना पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड ट्रोल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना कॅमेरा लूक दिला आहे. त्यावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
या छायाचित्राचे निट निरिक्षण केल्यास असे दिसते कि, नरेंद्र मोदी यांनी निवडणूक अर्ज हातात घेत तो निवडणूक अधिकाऱ्यांकडे देत आहेत. यावेळी उमेदवार असलेल्या द्रौपदी मोर्मू या त्यांच्या बाजूला उभ्या आहेत. आता फोटोसाठी दुसऱ्याचा अर्ज सुद्धा स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणाऱ्या नरेंद्र मोदी समाजमाध्यमांवर ट्रोल होत आहेत. त्यांच्यावर टीका देखील केली जात आहे.
या सर्वांची जी पितृसंघटना आहे तिच्यामधे स्त्रियांना कायमच दुय्यम ठेवण्याचे शिकविलेले आहे. ते अनेकदा उघड झालेलेही आहे. या छायाचित्रातही अगदी तसेच आहे. एका आदिवासी महिलेला विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या राज्यघटनेनूसार राष्ट्रपती करावीच लागत आहे पण तिचे सर्व सुत्र आपल्याचकडे कसे रहातील याची कि फक्त झलक आहे असं म्हणत या फोटोवरून नरेंद्र मोदी व आरएसएस वर टीका होताना पाहायला मिळतं आहे.
द्रौपदी मोर्मू कोण आहेत?
द्रौपदी मोर्मू ह्यांनी शिक्षिका म्हणून कामाची सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्यांनी राजकारणात भाग घेतला. ओडिशामध्ये त्यांनी आमदार म्हणून काम केले आहे. तसेच त्या काही कालावधीसाठी मंत्री होत्या. २०१५ ते २०२१ या काळात त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. भाजपकडील बहुमताचा आकडा पाहता द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.