Home > Politics > राष्ट्रपती पदाची माळ महाराष्ट्रातील नेत्याच्या गळ्यात?

राष्ट्रपती पदाची माळ महाराष्ट्रातील नेत्याच्या गळ्यात?

राष्ट्रपती पदाची माळ महाराष्ट्रातील नेत्याच्या गळ्यात?
X

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीवरून देशातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. मात्र राष्ट्रपती पदाचा उमेदवार कोण असणार? राष्ट्रपती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चा सुरू झाली असतानाच महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याचे नाव समोर आले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी विरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नकार कळवला. त्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे विरोधी आघाडीकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान राष्ट्रपती पदाची माळ महाराष्ट्रातील नेत्याच्या गळ्यात पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शरद पवार यांनी नकार कळवल्यानंतर काँग्रेसकडून राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम

राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 15 जून रोजी सुरू झाली असून 29 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाणणी होणार आहे. तर 2 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. यानंतर 18 जुलै रोजी गरज असल्यास मतदान होणार आहे आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. कारण 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

भाजपकडून राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तर या समितीत केंद्रीय मंत्री भारती पवार आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. याबरोबरच राजनाथ सिंह यांच्यावर विरोधकांशी समन्वयाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांनी शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांशी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. मात्र विरोधी पक्षाने ही निवडणूक लढवायचीच असा चंग बांधला आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक रंगतदार होणार आहे.

Updated : 19 Jun 2022 8:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top