अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम जनतेकडून होईल – चंद्रशेखर बावनकुळे.
अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम जनतेकडून केला जाईल असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. बारामतीचा विकास झाला नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
X
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम करण्याचे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक होऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, "माझ्या बारामतीतील दौऱ्यामुळे जनता भाजपमय झाली आहे. त्यामुळे अजित पवारांनी टीका माझ्यावर केली आहे. २०२४ च्या निवडणुकीत जनता कुणाचा करेक्ट कार्यक्रम करेल, ते कळेलचं.
परंतू बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नव्हे. अजित पवारांच्या करेक्ट कार्यक्रमाबद्दल जनता त्यांचा २०२४ मध्ये करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही." असं वक्तव्य बावनकुळे यांनी माध्यमांसमोर केलं आहे. तसेच बावनकुळे पुढे म्हणाले की "गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व बारामतीवर आहे, परंतू बारामतीचा विकास हावा तसा झाला नाही. त्यामुळे जनता प्रचंड नाराज असल्याचे देखील पाहायाला मिळतं आहे. पैसापासून सत्ता आणि सत्तेपासून पैसा असेच राजकारण राष्ट्रवादीने केले आहे.
ज्यांनी ५० वर्ष राजकारणात फक्त पैसा कमावाला. त्यांना लोकआयुक्ताची भिती वाटते." असे बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावरती आरोप केले आहेत. तसेच पीएमआरडीए मध्ये अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ग्रीनबेल्टचा जमीनी येलोगेटमध्ये रुपांतर केलेल्या आहेत. हा घोटाळा काढण्यासाठी आम्हाला फक्त एकच बॉम्ब पुरेसा आहे. असा इशारा बावनकुळे यांनी अजित पवारांना दिला आहे,