पंजाबमधे पुन्हा राजकीय भुकंप : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिध्दूंचा राजीनामा
X
अंतर्गद वादामुळे खांदेपालट होऊनही पंजाबमधे राजकीय वाद थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झालेले कॅ.अमरींदर सिंह दिल्लीत अमित शहाभेटीची बातमी असताना अचानकपणे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा नवज्योत सिध्दूंनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे सोपवला आहे.
पंजाबमधील राजकीय वादाला सुरवात नवज्योत सिंग सिध्दुंच्या प्रदेशाध्यक्ष निवडीने झाली होती. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या समवेत मदभेद टोकाला गेले होते. त्यातूनच अखेर अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी चरणजीत सिंह चन्नी यांची नेमणुक मुख्यमंत्री पदी झाले.
त्यानंतर काही दिवसांत सिध्दु आणि अमरींदर सिंह या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचं देखील दिसून आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. त्याचत सिंध्दुंचा राजीनामा आला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी ते कॉंग्रेसमधे सक्रीय राहणार असल्याचे त्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लिहलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.