काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर- राजकीय विश्लेषक संतोष खेडेकरांचे मत...
X
पदवीधर निवडणूकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. आज काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेते पदाचा राजीनामा दिला. आणि हा राजीनामा त्यांनी हायकमांडला पाठवल्याचे बोलले जात आहे.
गेला एक महिन्यापासून राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत या घडामोडींचे सामाजिक कारणावर मोठ्या परिणाम परिणाम बघायला मिळत आहे. त्याचबरोबर पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसमधील खदखद बाहेर निघाली आहे, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संतोष खेडेकर यांनी आज संगमनेर येथे व्यक्त केले.
ज्येष्ठ नेतृत्व व संयमी नेतृत्व म्हणून ज्या नेतृत्वाकडे बघितले जाते. त्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज गटनेते पदाचा राजीनामा दिला. मात्र थोरात यांना राजीनामा द्यावा लागतोय ही मोठी खेदजनक गोष्ट आहे. असे मत राजकीय विश्लेषक संतोष खेडेकर यांनी व्यक्त केले. बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र देत या पत्रात म्हटले आहे की, मी प्रदेशाध्यक्षांसोबत काम करू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे. या राजीनाम्यामुळे राज्यात राजकीय पटलावरती मोठ्या प्रमाणात घडामोडी बघायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं हे कोणताही ज्योतिषी सांगू शकत नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेशक संतोष खेडेकर यांनी मांडले आहे.
राज्यातील राजकीय वातावरण बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यामुळे ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरात हे जर भाजपामध्ये प्रवेश करण्यास तयार असतील, तर त्यांचे आम्ही पक्षात स्वागत करु असे म्हटले आहे.