मोदींनी करून दाखवलं!
X
2014 च्या निवडणूकीपुर्वी महागाई कमी करण्याच्या मुद्द्यावर जोर देत नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदापासून ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहचले. मात्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर देशातील महागाईचा आलेख वाढतच आहे. त्यापार्श्वभुमीवर घरगुती गॅसचे नवे दर जाहीर झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवलं अशी चर्चा रंगली आहे.
अब बस हो गई महंगाई की मार,
अब की बार मोदी सरकार…
ही जाहिरात पाहून अनेकांनी मोदींना मतदान केले. मात्र मोदींच्या काळात महागाईने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जनतेची या जाहिरातीने दिशाभूल केली.
ना खाउंगा ना खाने दुंगा…, असं म्हणणाऱ्या मोदी सरकार ने आता घरगुती खाद्य पिठाला देखील जीएसटी लावला आहे. महागाई ने गरीबांचे कंबरडे मोडलेले असताना मोदी सरकारने दही, पीठ,पनीर,लस्सी,मध यावर 5 % GST लावला आहे..
सर्वसामान्यांच्या खिशाला केंद्र सरकारने कात्री लावलेली असताना घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळं राजधानी दिल्लीतच गॅस ची किंमत आता १०५३ झाली आहे. ५ किलो चा गॅस १८ रूपयांनी वाढला आहे.
गेल्या वर्षी राजधानी दिल्लीमध्ये दिसती किंमत ८३४ रूपये होती. त्यानंतर २२ मार्च ला, ७ मेला गॅसच्या दरात वाढ होत आता गॅसच्या दराने हजारी पार केली आहे.
पेट्रोल, डिझेल, सीएनजी या इंधनाचे दर झपाट्याने वाढत असताना घरगुती गॅसच्या वाढत्या दराने गृहीनींचं घरातील आर्थिक गणित कोलमडलं आहे.
एकंदरीत मोदी यांनी जाहिरातीत सांगितल्या प्रमाणे महागाई कमी केली नाही तर वाढवली असल्याचं दिसून येत आहे.