Home > Politics > मोदी मंत्रीमंडळात नवीन 'सहकार' खात्याची निर्मिती, सहकार खातं महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता?

मोदी मंत्रीमंडळात नवीन 'सहकार' खात्याची निर्मिती, सहकार खातं महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता?

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार हे खातं? 'हे' नाव आघाडीवर? PM Modi Cabinet Expansion Cabinet reshuffle Narayan rane Will First Co-operation Minister of India Modi Government create a new Ministry of Co-operation

मोदी मंत्रीमंडळात नवीन सहकार खात्याची निर्मिती, सहकार खातं महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता?
X

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार उद्या 8 जुलैला होणार आहे. मात्र, मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात (PM Modi Cabinet Expansion) एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. ती म्हणजे मोदी सरकारने नवीन खातं तयार केलं आहे. (Cabinet reshuffle) ते खातं म्हणजे सहकार खातं. (Modi Government create a new Ministry) आता या खात्याचा फायदा खरंच महाराष्ट्रासह सहकाराचं जाळ अधिक असणाऱ्या राज्याला होईल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सहकार क्षेत्रासाठी प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक बाबी मजबूत करण्यासाठी या नवीन खात्याची निर्मिती करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान या निमित्ताने देशाचे पहिले सहकार मंत्री कोण असतील? यांची उत्सुकता आहे. महाराष्ट्रात सहकाराचं जाळं मोठ्या प्रमाणात असल्याने आता हे खातं महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं राणे यांच्या गळ्यात सहकार खात्याची माळ दिली जाते का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Narayan rane Will First Co-operation Minister of India)


उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हा मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला विस्तार असून मोदी सरकार मधील जवळपास 24 मंत्रीपदाच्या जागा रिक्त आहेत

Updated : 6 July 2021 11:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top