"या आमदारांनी परत निवडून येऊन दाखवावे.." - संजय राऊत
X
शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात आहेत. ED व आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील विशेषता जे स्वतःला बछडा किंवा वाघ असं समजून घेत होते. सोडून गेलेले आमदार म्हणजे पक्ष नाहीत तर आपण जो काल रस्त्यावर पहिले तो पक्ष आहे. सोडून गेलेल्या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे संजय राऊत यांचा इशारा..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३५च्यावर आमदारांनी बंड केले आहे. यानंतर व्यथित झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या आमदारांना आवाहन करत आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, पण शिवसैनिक मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सुद्धा शिंदे गटाला जाऊन मिळणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्या या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात आहेत व या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असा इशारा दिला आहे
खासदार संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी, ED व आमिषांना बळी पडून काही आमदार पळाले असतील विशेषता जे स्वतःला बछडा किंवा वाघ असं समजून घेत होते. सोडून गेलेले आमदार म्हणजे पक्ष नाहीत तर आपण जो काल रस्त्यावर पहिले तो पक्ष आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अद्यापही मजबूत आहे. आमदार का सोडून गेले याची करणे देखील लवकरच समोर येईल. तरी त्यांच्यातील काही लोकांशी चर्चा सुरू आहे. नितीन देशमुख आणि कैलास पाटील आमदार आज पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नक्की काय प्रकार सुरू आहे हे सांगणार असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.