Home > Politics > Pegasus : याचिकाकर्त्यांनी सोशल मीडियावरील वाद टाळावे- सुप्रीम कोर्ट

Pegasus : याचिकाकर्त्यांनी सोशल मीडियावरील वाद टाळावे- सुप्रीम कोर्ट

Pegasus : याचिकाकर्त्यांनी सोशल मीडियावरील वाद टाळावे- सुप्रीम कोर्ट
X

courtesy social media

Pegasus प्रकरणावरुन सध्या संसदेत आणि संसदेबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू आहे. याच मुद्द्यावरुन आता सुप्रीम कोर्टातही काही याचिका दाखल झाल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत कोर्टाच्या निगराणीखाली झाली पाहिजे, या मागणीसह केंद्र सरकारने Pegasus स्पायवेअरचा वापर केला का, याची माहिती मिळवण्यासाठी अनेक जणांनी याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे.

या सुनावणी दरम्यान कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले आहे. याप्रकरणा संदर्भात तुम्ही ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर काय व्यक्त व्हायचे ते व्हा, पण कोर्टाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य मार्गाने इथे द्यावी लागतील असे कोर्टाने बजावले आहे. "याचिकाकर्त्यांपैकी जे कुणी वृत्तपत्रांना काही माहिती देत आहेत, त्यांना आम्ही विचारलेल्या प्रश्नांना बाहेर नव्हे तर कोर्टातील वादविवादामध्ये सविस्तर उत्तरे द्यावी लागतील. ट्विटर किंवा सोशल मीडियावर काय करायचे हा तुमचा प्रश्न आहे. पण कोर्टात प्रकरण सुरू असेल तर इथे उत्तर द्यावे लागले. न्यायव्यवस्थेचा आदर ठेवावाच लागेल."

या शब्दात कोर्टाने बजावले आहे. तसेच याप्रकरणी नोटीस बजावण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाईल असेही सर न्यायाधीशांनी यावेळी सांगितले.

Updated : 10 Aug 2021 4:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top