Home > Politics > केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पंकजा मुंडे यांनी केला शुभारंभ

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पंकजा मुंडे यांनी केला शुभारंभ

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पंकजा मुंडे यांनी शुभारंभ केला मात्र या यात्रेच्या सुरवातीलाच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत मंत्री कराड यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पंकजा मुंडे यांनी केला शुभारंभ
X

बीड :केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा पंकजा मुंडे यांनी शुभारंभ केला मात्र या यात्रेच्या सुरवातीलाच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करत मंत्री कराड यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ परळीच्या गोपीनाथ गडावरुन झाला . गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन कराड यांची यात्रा गंगाखेड मार्गे नांदेडकडे रवाना झाली.

केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर, आज मंत्रीपद मिळालेल्या मंत्र्यांकडून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्री मंडळातून डावल्यानंतर कराड यांची मोठी चर्चा होती. मात्र आज अखेर नाराजी दूर करून पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या स्वतः उपस्थित राहून त्यांनी कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे.

दरम्यान यावेळी परळी येथील गोपीनाथ गडावर फुलांची आरास करून मोठी सजावट करण्यात आली होती, दुपारी एक वाजता कराड यांच्या या यात्रेला सुरुवात झाली आहे. परंतु यावेळी मुंडे समर्थकांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

गोपीनाथ गडावर मुंडे समर्थकांनी कराड यांच्यासमोर जोरावर घोषणाबाजी केली आहे. या नाराज मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे यांनी झापलं असून, घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे दारापुढे येऊ नका, अशा शब्दात संतप्त होऊन पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे यांनी नाराज मुंडे समर्थकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र आजही मुंडे समर्थकांची नाराजी कायम असल्याचं या ठिकाणी दिसून आलं आहे.

Updated : 16 Aug 2021 7:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top