कांदा खरेदीचं नाफेडचे अजब माप-विरोधी पक्षनेते अंबादास दानवें
एकीकडे कांदयाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त असताना नाफेडने ५५- ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेत सांगितले.
विजय गायकवाड | 3 March 2023 2:54 PM IST
X
X
नाफेड जर ५५ - ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्याला २ रुपयांचा चेक आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी कोणत्याही अटी व शर्तीशिवाय नाफेड कांदा खरेदी करेल, असे सभागृहात म्हटले होते. कांदा शेतकऱ्यांच्या या समस्येवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले, याची दखल उपमुख्यमंत्री यांनी घेऊन याबाबत माहिती घेणार असल्याचे सांगितले.
Updated : 3 March 2023 2:54 PM IST
Tags: nafed onion nafed nafed in maharashtra maharashtra news maharashtra onion market onion onion mandi delhi nafed ki pyaj today onion market price nafed online registration maharashtra nafed online registration maharashtra 2023 onion price in maharashtra onion export maharashtra to bangladesh nafed onion loss nafed kya hai nafed purchased onion from farmers review on onion purchased by nafed nafed onion gets rotten harbhara nafed nondani 2023
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire