Home > Politics > काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही, शिवसेनेनं ममता दीदींना सुनावलं

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही, शिवसेनेनं ममता दीदींना सुनावलं

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही, शिवसेनेनं ममता दीदींना सुनावलं
X

युपीए आता अस्तित्वात नाही आणि ज्यांना लढायचे आहे त्यांनी पुढे आले पाहिजे, असे वक्तव्य करत ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर भाजपविरोधात काँग्रेसशिवाय आघाडी करण्याचे ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण आता या चर्चेत शिवसेनेनंही सहभागी होत काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी शक्य नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत काँग्रेसशिवाय जी काही तिसरी किंवा चौथी आघाडी झाली आहे त्याचा फायदा भाजपलाच झाला आहे, असे सांगत संजय राऊत यांनी सोनिया गांधी ह्या आताही युपीएच्या अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाला कुणीही आक्षेप घेतलेला नाही, असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही काँग्रेससोबत मतभेद आहेत पण भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडी देखील युपीएचाच भाग आहे. ममता बॅनर्जी यांची समजूत घालून भक्कम आघाडी तयार करु असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. सध्या काँग्रेस कमजोर झाली असली तरी या पक्षाला इतिहास आहे आणि राहुल तसेच प्रियंका गांधी हे संघर्ष करत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Updated : 4 Dec 2021 1:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top