नितीन गडकरी : फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 13 Aug 2022 6:47 PM IST
X
X
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्याची नियुक्ती होते, त्याची पुढे जास्त प्रगती होते, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच व्हावेत, असे आपले म्हणणे आहे, पण फडणवीस यांना केंद्रात संधी मिळाली तर बावनकुळे यांचा नंबर लावू लागू शकतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नागपूरमध्ये त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमातील भाषणात गडकरींनी जोरदार टोलेबाजी केली.
Updated : 13 Aug 2022 6:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire