'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' ; नितेश राणे यांचं शिवसेनेला थेट आव्हान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान यावर भाष्य करताना 'सिंहाच्या गुहेत शिरण्याचे धाडस करू नका' असं नितेश राणे यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 24 Aug 2021 9:48 AM IST
X
X
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाल्याचे बातम्या येताच त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. दरम्यान नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे.युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्यास सांगण्यात आले असून मुंबई पोलीस त्यांना तिथे येण्यापासून रोखावे अन्यथा तिथे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही !! सिंहाच्या घरात जाण्याचे धाडस करू नका असं नितेश राणे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये आहे, त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाल्याच्या बातम्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मात्र गोची होतांना दिसत आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. असं म्हणत , त्यांना अटक झाली तर त्यावरुन जे काय होईल त्याला सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. एकूणच या प्रकरणावरून भाजप चांगलंच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Updated : 24 Aug 2021 9:57 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire