काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली, नाना पटोलेंना राजेंद्र शिंगणे यांचे उत्तर
X
–
बुलडाणा - राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत, पण याच दरम्यान विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान जोरदार संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद करणार अशी घोषणा बुलडाण्यात केली होती. त्याला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उत्तर दिले आहे.
"आपले दुकान एवढे मोठे आहे, की ती बंद करायला तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी कोणी बंद करु शकत नाही, असे प्रत्युत्तर शिंगणे यांनी नाना पटोले यांना दिले आहे. 7 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एका कार्यक्रमात पटोले यांनी राष्ट्रवादीवर प्रहार केला होता. "पंढरपुर येथे राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार असे दिग्गज नेते बसलेले असतांना पंढरपूरचा उमेदवार पडला व ते दुकान बंद झाले. तर विदर्भात राष्ट्रवादीचे बुलडाण्यात एकच दुकान आहे ते एकमेव दुकान बंद करायला काय लागतं...? असे वक्तव्य नाना पटोलेंनी डॉ. शिंगणे यांचे नाव न घेता केले होते. या वक्तव्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.
तर पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी उत्तर देत "आपले दुकान एवढे मोठे आहे की 7 पिढ्या आल्या तरी कोणी बंद करु शकत नाही" असे म्हटले आहे. जिल्ह्यातील भेंडवळ येथे 26 नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलत होते...