Home > Politics > राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजारावरून रण पेटले, संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचीही भाजपवर टीका

राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजारावरून रण पेटले, संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचीही भाजपवर टीका

राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजारावरून रण पेटले, संजय राऊत यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचीही भाजपवर टीका
X

राज्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांनी सहावी जागा आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. मात्र या निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजारावरून रण पेटले आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणूकीत भाजपकडून घोडेबाजार केला जाणार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अपक्ष आमदारांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही घोडेबाजारावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यसभा निवडणूकीत घोडेबाजार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, घोडेबाजारीला खतपाणी घालण्याची परंपरा भाजपची आहे. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून राज्यसभेसाठी मुद्दामहून सातवा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आला. एवढंच नाही तर घोडेबाजार करुन आमदार फुटतील असा प्रयत्न भाजपचा असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला. मात्र महाविकास आघाडीला समर्थन देणारे घटक पक्ष आणि अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत. जेव्हा राज्यसभेचे मतदान होईल त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत असेल आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आलेले असतील असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

Updated : 7 Jun 2022 12:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top