शरद पवार यांचा राज ठाकरे यांना पुन्हा एक सल्ला...
X
'महाराष्ट्रात जात ही गोष्ट आधीपासूनच होती. मात्र, स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. आता मात्र, जात ही नेत्यांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे.' असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.
'राज ठाकरे यांच्या विधानावर भाष्य न करणंच बरं, राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचे लिखाण वाचले पाहिजे. त्यातून त्यांचे गैरसमज दूर होतील. असा टोला शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लगावला आहे.
दरम्यान राज ठाकरे यांना शरद पवार यांनी सकाळी लवकर उठण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी तो ऐकला देखील होता. त्यामुळं आता शरद पवार यांनी राज ठाकरे यांना दिलेला सल्ला ऐकतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पाहा काय म्हटलंय शरद पवार यांनी